रविवारची वेळ होती ,
मी हॉललमधे पेपर वाचत होतो ;
ती नुकतीच सुस्नत होऊन बाहेर आली ,
"चहा घेणार का तुम्ही ?" असं मला म्हणाली ;
मी तिचाकडे न बघताचं "हो" म्हणालो ,
आणि पुन्हा पेपर वाचण्यात गढून गेलो ;
माझा जवळून जाताना तिने केसांचा नाजूक झटका दिला ,
त्यातून उडालेल्या तुषारांनी पेपर मात्र ओला झाला ;
मी उगाच खट्याळ नजरेने तिचाकडे पहिले ,
तिनांही मग खोट्या रागाने तोंड आपले फिरवले ;
मी हळूच उठलो खुर्चीवरुन आणि स्वयंपाक घरात आलो ,
तिनं मझाकडे बघवं म्हणून फ्रीजवर तबला वाजवू लागलो ;
तिनं मात्र मागे न बघतच चहाचं आधन ठेवलं ,
आणि मग मला चिडावण्यासाठी आपलं नाक उडवलं ;
तिचा पाठमोरया रूपाकडे बघत मी क्षणभर तसाच थांबलो ,
उगाच तिला दुखावले म्हणून स्व:ताचाच मनाशी भांडलो ;
हळूच मग मागून जाऊन मग मी तिचा कमरेला विळखा घातला ,
पण गडबडीत चहाच्या भांड्याला लागून हात माझा भाजला ;
मी कळवळून हात झटकताना ती मात्र मनसोक्त हसली ,
चवटपनाची वेडी लहर माझा मनात मग उठली ;
मी जखडले तिला मिठीत, ती म्हणाली "जाऊ द्या ना !"
मी म्हणालो तिला "तुला माझ्यात सामावू दे ना !"
ती लाजून म्हणाली "अहो असं काय करता ? चहा उकळतोय !"
मी म्हणालो "उकळू दे ! ईतं माझा जीव जलतोय !"
"अहो असं काय करता ? दूध उटू जाईल ना !"
"कशाला काळजी करतेस मी परत आणून देईल ना!"
ती उगाच कारणं देत होती, मी प्रत्येक कारण उडवत होतो ,
तिला अजुनच जवळ घेत , माझा मनासारखं घडवत होतो,
शेवटी तिनं कारण दिलं "अहो सिलेंडरचा बहुतेक वास येतोय !"
मी म्हणालो "हो का ! मला वाटले की माझा चवटपणा अती होतोय"
तेवढ्यात दाराची कडी वाजली,
मी मानातल्या मनात बाहेरच्याला इरसाल शिवी घातली ;
तिनं झटकन स्वत:ला माझा तावदीतून सोडवून घेतलं ,
आणि हळूच मला धक्का मारुन, स्वयंपाक घराबाहेर लोटलं ;
मी वैतागाने दार उघडलं समोर कचरावला दिसला ,
माझा खांद्याशी ओला झालेला शर्ट पाहून तो पण गालात हसला ;
मी कचरा देऊन झटकन दार लावून घेतलं ,
पण मागे वळताक्षणि काहीतरी विचित्र घडणार आहे, असं मला वाटलं ;
पहिले मला स्वयंपाक घरातून, दूध जाळण्याचा वास आला,
नंतर कान दनाणून सोडणारा, सिलेंडरचा स्फोट झाला ;
मी धावत आत गेलो, माझं हृदय धड धडत होतं ,
माझ्या डोल्यंदेखात तिचं पातळ आगीवर फडफडत होतं ;
मी तिला उचलून घेतलं ,डोळे माझे झारंत होते ;
मोठ्या कष्टानं तिने डोळे उघडले ,
ती म्हणाली मला "एकदा मला तुमच्या मिठीत घ्या ना !"
"मरण्यापूर्वी मला, तुमच्यामधे सामावू द्या ना !"
मी कवटाळले तिला उरासी, आणि देवाचे स्मरण करू लागलो ,
ती वाचावी म्हणून त्याची करुणा भाकु लागलो ;
पण दूध उतू गेलं होतं , ओटा मात्र फेसळला होता ,
आम्हा दोघांचं अमर आलिंगन पाहून, तिचा मृत्यूही क्षणभर रेंगालला होता ...
Friday, May 4, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment