आपले रस्ते अवचित कुठे जुळले?
आपल्याच नादात चालताना
हे देखणे वळणं कसे भेटले?
कशाभोवती
ही कसली अनोखी रंगत खुलते आहे
जगाने व्हावं गाणे
अशी स्वरांची संगत जुळते आहे

पण खरं सांगू..??
या वाटाचं हे असं भेटणं बरं नव्हे...
जीवघेणा उत्कट असला तरीही ते खरा नव्हे..
तुझी दिशा पूर्वीच निश्चित आहे
ती बदलणं आता हिताचं नाही
माझ्यापूरता बोलायचा..
तर मला माझी दिशाच नाही
तुझ्या संगतीत
आनंद आहे, आश्वासन आहे, दिलासा आहे

माझ्या मात्र स्वप्नांच्या हातात
फक्त भंगण्याचाच वसा आहे
म्हणून म्हणतो,
अशा वाटनी मुळात एकत्र येऊ नये
जीव जडवून, चटका लावून
निदान दूर होणं असु नये
पण अशाच वेळी कळून येतं
आपण आपले मालक नसतो
रस्ते आपली दिशा आखातात
आपण फक्त चालत असतो....!!!!
- सुधीर मोघे
No comments:
Post a Comment