अशी हात झटकून जावू नकोस
एकटा उभा बघ मी अंधारात
ठेव ना…..सोबत दिवा नेवू नकोस
चोहिकडे अंधार दाटलेला
वटवागुळांची किरकिर…..
बघ सारे बोचकारतात मला
तुला नाही का माझी फिकिर
वटवागुळांची किरकिर…..
बघ सारे बोचकारतात मला
तुला नाही का माझी फिकिर
हळूहळू दोघे चालत राहू
दिव्याच्या प्रकाशात…….
सोबत दे ना मला तुझी
खडतर प्रवासात…….
दिव्याच्या प्रकाशात…….
सोबत दे ना मला तुझी
खडतर प्रवासात…….
सूर्यकिरणे दिसेपर्यंत
चालत राहू आशेने……
धर जरा हात घट्ट
चल सोबत विश्वासाने…..
चालत राहू आशेने……
धर जरा हात घट्ट
चल सोबत विश्वासाने…..
No comments:
Post a Comment