Tuesday, November 27, 2007

कारण काहीही असो ...

कारण काहीही असो ...
पण निरोप घेताना
तट तट तुटतंच की काळजात .
पाय निघण्याआधीच
डोळ्यांत साठू लागलेल्या असतात
उद्यापासून त्रास देणार्या,
तरीही जपाव्याश्या वाटणार्या
कालच्या आठवणी ....
मग अनिवार्य होउन बसतं
त्यांना वाहू न देता
सांभाळून ठेवणं ...
हो ! उद्या कुणी विचारलंच
" काय मिळवलंस ? "
तर
बघता तरी येतं
नजर उचलून .... निरोपाचा क्षण


डोळ्यांच्या ओलसर कडा..
लपवता लपवता वेळ येते..
नजरेची भाषा अबोध होउन जाते,
आणि हलणारा हात दिसेनासा
होण्याआधी पाठ वळते..
हळवा श्वास उष्ण झरा बनुन
सगळ्या अडथळ्यांना वळसा..
घालुन वहात राहतो..
थरथरते ओठ खारट होतात..
चिवचिवते मनपाखरु...
पंख मिटुन निश्चल पडते..
काल आणि उद्याही आठवत नाही
फ़क्त मिटुन घ्यावा हा क्षण नकोसा झालेला..
तरी का दाटुन राहावा हा क्षण नकोसा.. झालेला!!!

No comments: